Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM | 28 December 2021
भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संतोष परब हल्ला (Santosh Parab) प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात (Sindhudurg Session Court) अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलाय. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे.
भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संतोष परब हल्ला (Santosh Parab) प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात (Sindhudurg Session Court) अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलाय. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालय ओरोस येथे ही सुनावणी होणार आहे. या सुनावणी दोन्ही बाजूंच्यावतीनं वकिलांची फौज उभी करण्यात येणार आहे. त्यामुळं सिंधुदुर्ग आणि कोकणच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान संतोष परब यांच्यावर झाला होता. यानंतर संतोष परब यांनी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे. संतोष परब यांच्याबाजून शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. संतोष परब यांच्यावरील हल्ल्यानंतर सध्या राजकीय वादंग पाहायला मिळतोय. राणे विरुद्ध सेना असा संघर्ष यामुळे निर्माण झालाय.