Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM | 8 December 2021
तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरला (Army Chopper Crash) आज दुपारी भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकूण 11 लोकांचा मृत्यू झाला. या हेलिकॉप्टरमधून माजी लष्कर प्रमुख आणि सीडीएस बिपीन रावतही (Bipin Rawat) पत्नीसह प्रवास करत होते.
तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरला (Army Chopper Crash) आज दुपारी भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकूण 11 लोकांचा मृत्यू झाला. या हेलिकॉप्टरमधून माजी लष्कर प्रमुख आणि सीडीएस बिपीन रावतही (Bipin Rawat) पत्नीसह प्रवास करत होते. तेही या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघात होताच हेलिकॉप्टरने पेट घेतला. ज्या झाडांवर हेलिकॉप्टर कोसळलं ती झाडंही कापली गेली अन् झाडांनीही पेट घेतला. तामिळनाडूच्या कुन्नूर येथील जंगलात ही दुर्घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जातं. हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जखमींना जवळच्या वेलिंग्टन बेसमध्ये नेण्यात आलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हेलिकॉप्टरमधून सीडीएस बिपीन रावत, मधुलिका रावत, ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्ट. कर्नल हरजिंदर सिंग, गुरुसेवक सिंग, जितेंद्र कुमार, विवेक कुमार, बी. साई तेजा आणि हवालदार सतपाल आदी प्रवास करत होते.