50 Super Fast News | मुंबईसह राज्यातील सात जिल्ह्यांना हवामान विभागाचा रेड अॅलर्ट
भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं राज्यासाठीचा पुढील 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांना रेड , ऑरेंज आणि यलो अॅलर्ट जारी केला आहे.
मुंबई: भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं राज्यासाठीचा पुढील 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांना रेड , ऑरेंज आणि यलो अॅलर्ट जारी केला आहे. आजच्या दिवसासाठी 7 जिल्ह्यांना रेड अॅलर्ट जारी केला आहे. आठ जिल्ह्यांमध्ये कोकणातील पाच आणि पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबई, पालघर, ठाणे रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्याला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ अधिकारी के.एस. होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Latest Videos