SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 10 October 2021

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 10 October 2021

| Updated on: Oct 10, 2021 | 8:40 AM

मुसळधार पावासाने पुणे शहराला पुन्हा एकदा झोपडून काढले आहे. पुण्याच्या पूर्व भागात शनिवारी 2 तासांपेक्षा जास्त वेळ पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे चाकरमानी तसेच नागरिकांची मोठी फजिती झाली. धानोरीत येथे सखल भागात पाणी साचले तर वाकडेवाडी, ताडीवाला रोड येथे वृक्ष उन्मळून पडल्ची घटना घडली.

पुण्यात चार दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला होता. या पावसामुळे रस्ते, नाले तुडूंब भरले होते. आज पुन्हा एकदा शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पवासामुळे धानोरी येथील संकल्प नगरीच्या सखल भागात पाणी साचले. मुसळधार पावसामुळे येथे इमारतीच्या पार्किंपर्यंत पाणी आले. ढगांच्या गडगडाटासह आज पुण्यात पाऊस बरसला.

पुणे शहरात पावसामुळे बरसल्यामुळे येरवडा, टिंगरेनगर, धानोरी, नागपूर चाळ, मुंजोबा वस्ती, म.हौ. बोर्ड येथे पाणी साचले. तर वाकडेवाडी, ताडीवाला रोड, वाडिया कॉलेज, येरवडा येथे वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या. तसेच पिसोळी ग्रामपंचायतजवळ वीज पडून आग लागल्याचा प्रकार समोर आला. घटनास्थळी घराबाहेरील मीटर बॉक्सने पेट घेतला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने दाखल होत आग विझवली. घराशेजारील इलेक्ट्रिक पोलवर वीज कोसळून पुढे लगेचच मीटर बॉक्सने पेट घेतला.

Published on: Oct 10, 2021 08:40 AM