100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 24 October 2021

100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 24 October 2021

| Updated on: Oct 24, 2021 | 10:06 AM

भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेत आजपासून आपली मोहिम सुरु करणार आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघ आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे.

भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेत आजपासून आपली मोहिम सुरु करणार आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघ आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. पाकिस्तानच्या किंवा जगातील कोणत्याही टीम विरोधात खेळताना पूर्ण क्षमतेनं आणि विश्वासानं सामोरं जातो. आम्ही पाकिस्तानच्या मॅचसाठी पूर्ण तयारी केली असून मॅच जिंकण्यावर आमचं लक्ष असेल, असं विराट कोहली म्हणाला.

आम्ही पाकिस्तान विरोधात यापूर्वी काय खेळ केला, आम्ही त्यांनी कितीवेळा पराभूत केलं याचा आम्ही विचार केला नाही. आमचं लक्ष त्या दिवशीच्या खेळावर आहे. त्या मॅचची आम्ही चांगली तयारी करतोय. पाकिस्तान ही चांगली टीम असून त्यांच्या विरोधात चांगली तयारी करुन खेळावं लागतं. आमचं लक्ष कामगिरीत सातत्य ठेवण्यावर असेल, असं विराट कोहली म्हणाला.