सुपरफास्ट 100 न्यूज | किसान लाँग मार्च मोर्चा महा मुक्काम मोर्चामध्ये रूपांतरित
काही मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असल्यातरिही जो पर्यंत निर्णयांच्या अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मोर्चा माघार जाणार नाही अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे
100 Super Fast News | किसान सभा लाँग मार्च मोर्चावरून आज दुपारी बारा वाजता राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. शेतकरी आंदोलन आणि सरकारी कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमिवर या बैठकीला महत्व आहे. राज्य सरकार आणि किसान सभेच्या प्रतिनिधींमध्ये कालच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली. किसान सभेच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सभागृहामध्ये निवेदन सादर करणार आहेत. काही मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असल्यातरिही जो पर्यंत निर्णयांच्या अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मोर्चा माघार जाणार नाही अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे. तर मुंबईकडे येणारा किसान लाँग मार्च मोर्चा सध्या वाशिमजवळ थांबल्याने आता महा मुक्काम मोर्चामध्ये रूपांतरित झाला आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची विधानपरिषदेमध्ये माहिती पिक विम्याचे पैसे मिळतील अशी माहिती दिली. सुप्रीम कोर्टामध्ये सत्तासंघर्षावर सुरू असलेली सुनावणी संपली. सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे कोणाच्या बाजूने येणार याची प्रतीक्षा दोन्ही गटासह राज्यातील जनता करत आहे.