SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 12 July 2021

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 12 July 2021

| Updated on: Jul 12, 2021 | 8:48 AM

बंगालच्या उपसागरावर पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी, मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे. नैऋत्य मोसमी वारे पुन्हा सक्रिय झाले आहेत. जवळपास 20 दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे.

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार व अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) याबाबत आज अ‍ॅलर्ट जारी केला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस ‘रेड अ‍ॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे, तर मुंबई शहर व उपनगरासाठी चार दिवस ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ जारी केला आहे. गेले दोन-तीन दिवसांपासून मुंबई शहरात पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र आता जोर वाढणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केला आहे.

बंगालच्या उपसागरावर पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी, मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे. नैऋत्य मोसमी वारे पुन्हा सक्रिय झाले आहेत. जवळपास 20 दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे. पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आज वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी, विभागांसाठी अ‍ॅलर्ट जारी केला आहे.

Published on: Jul 12, 2021 08:48 AM