SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 13 September 2021
2017मध्ये एका परिपत्रकाच्या आधारावर तत्कालीन फडणवीस सरकारने नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ दिल्या नव्हत्या. त्यावेळी महाधिक्ता कुंभकोणी होते. आजही कुंभकोणीच अधिवक्ता आहेत. तरीही कोर्टाचे निर्णय वारंवार सरकारच्या विरोधात का येत आहेत. याबाबत आम्हाला संशय आहे म्हणून या गोष्टी सरकारच्या निदर्शनास आणून देणं हे आमचं दायित्व आहे, असं पटोले म्हणाले.
राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या भूमिकेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संशय व्यक्त केला आहे. कुंभकोणी महाधिवक्ता असताना सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय राज्य सरकारच्या विरोधात का जात आहे? असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांनी याबाबतची चौकशी करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. तसेच महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर कुंभकोणी यांना बदललं का नाही?, असा सवालही पटोले यांनी केला आहे
नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना हा संशय व्यक्त केला आहे. 2017मध्ये एका परिपत्रकाच्या आधारावर तत्कालीन फडणवीस सरकारने नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ दिल्या नव्हत्या. त्यावेळी महाधिक्ता कुंभकोणी होते. आजही कुंभकोणीच अधिवक्ता आहेत. तरीही कोर्टाचे निर्णय वारंवार सरकारच्या विरोधात का येत आहेत. याबाबत आम्हाला संशय आहे म्हणून या गोष्टी सरकारच्या निदर्शनास आणून देणं हे आमचं दायित्व आहे, असं पटोले म्हणाले.