SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 23 October 2021
पुण्यात डॉक्टर्स, दोन्ही महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्या प्रयत्नानं पुणे लसीकरणात आघाडीवर आहे. राज्याच्या तुलनेत बारा टक्के लसीकरण पुण्यानं केलं. तर देशाच्या तुलनेत दहा टक्के लसीकरण महाराष्ट्रानं केलं आहे. राहिलेलं लसीकरण वेगात कसं करता येईल याची चर्चा करण्यात आली आहे. लोक प्रतिनिधींच्या मागणीवरून दिवाळी पहाटला मंजुरी देण्यात आली आहे. मिशन कवच कुंडल या मार्फत लसीकरणाचा वेग वाढवण्यात येत आहे. पुणे शहरात सीरमच्या सहकार्यानं तर ग्रामीण भागातही लसीकरण केलंय जातंय.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दर शुक्रवार प्रमाणं आज पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कोरोना लसीकरणासाठी काम करणाऱ्या सर्वा घटकांचं अभिनंदन केलं. कोरोना प्रमाण कमी झाल्यानं दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी परवानगीची मागणी करण्यात आली, त्यालाही परवानगी देण्यात आल्याचं जाहीर केलंय. याशिवाय ग्रामीण आणि शहरी भागातील आठवडी बाजार सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याचं अजित पवार म्हणाले.