SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 29 October 2021
साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. दरम्यान, ट्रक महामार्गावरुन खाली सेवा रस्त्यावर आला. पुढे सेवा रस्त्यालगत असणाऱ्या रॉयल रेस्टो बारच्या पायऱ्यांना धडकला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक चालक मात्र जखमी झाला आहे.
बंगळुरु-मुंबई महामार्गावर नऱ्हे येथील नवले पूल परिसरात आठ दिवसांत चौथा अपघात घडला आहे. सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. पंचवीस फूट महामार्गावर ट्रक खाली आला.
बंगळुरु-मुंबई महामार्गावर नऱ्हे येथील सेल्फी पॉइंट येथे गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट सेवा रस्त्यावर गेला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक चालक मात्र जखमी झाला आहे.