SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 31 July 2021
पूरग्रस्त भागात वीज बिल वसूली करु नका, असे आदेश आज नितीन राऊत यांनी दिले आहेत. परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर बिल भरण्यासाठी सवलत दिली जाईल, असंही ऊर्जामंत्री यावेळी म्हणाले. वीज बिल माफीचा निर्णय अद्याप झालेला नाही. तो निर्णय मी नाही तर मंत्रिमंडळ करेल, असंही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
राज्यात महापुरानं थैमान घातलं आहे. घरात छतापर्यंत पाणी शिरल्यानं अनेकांचे संसार मोडून पडले आहेत. त्यामुळे दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न पूरग्रस्त भागातील नागरिकांना भेडसावत आहे. अशावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांना मोठा दिलासा दिलाय. पूरग्रस्त भागात वीज बिल वसूली करु नका, असे आदेश आज नितीन राऊत यांनी दिले आहेत. परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर बिल भरण्यासाठी सवलत दिली जाईल, असंही ऊर्जामंत्री यावेळी म्हणाले. वीज बिल माफीचा निर्णय अद्याप झालेला नाही. तो निर्णय मी नाही तर मंत्रिमंडळ करेल, असंही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, निसर्ग व तौक्ते चक्रीवादळ व पुरामुळे वीज यंत्रणेचे खूप नुकसान झाले आहे. उघड्यावर वीज यंत्रणा असल्यामुळे प्रथम नैसर्गिक संकटाचा सामना ऊर्जा विभागाला करावा लागतो. यावर उपाययोजना व संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी आपत्ती विभाग स्थापन करण्याचा मानस असल्याचे राऊत म्हणाले. कोकणात वारंवार नैसर्गिक संकटे येत आहे. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे कायमस्वरूपी तळ निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.