SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 4 August 2021
संबंधित युवक मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेले. त्या ठिकाणी 6 ते 8 टवाळखोर तरुण होते. त्यांनी सुरुवातीला अश्लील शेरेबाजी केली आणि नंतर तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत या चौघांना बेदम मारहाण केली.
कल्याणमधील मलंगगड परिसरात टवाळखोर तरुणांचा उच्छाद सुरू असल्याचं समोर आलंय. या तथाकथित संस्कृतीच्या ठेकेदारांनी मलंगगडच्या पायथ्याशी तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत फिरायला आलेल्या दोन तरुण आणि दोन तरुणींना बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर त्यांनी दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत विनयभंगही केला. या धक्कादायक घटनेमुळे मलंगगड परिसरातील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
संबंधित युवक मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेले. त्या ठिकाणी 6 ते 8 टवाळखोर तरुण होते. त्यांनी सुरुवातीला अश्लील शेरेबाजी केली आणि नंतर तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत या चौघांना बेदम मारहाण केली. आरोपी इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचाही प्रयत्न करत विनयभंग केला. ही घटना रविवारी (1 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास घडली.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या या चौघांनी आधी स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर नेवाळी पोलीस चौकी गाठली. तेथे या प्रकाराची तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना मेडिकल करून या, इथे तक्रार होणार नाही. हिल लाईन पोलीस स्टेशनला जा असं सांगत तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. मात्र, यातील पीडित तरुणीने हिम्मत न हारता सोशल मीडियावरून या घटनेला वाचा फोडली. त्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी (3 ऑगस्ट) संध्याकाळी उशिरा गुन्हा नोंद करत आरोपीचा शोध सुरु केला आहे.