SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 4 October 2021

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 4 October 2021

| Updated on: Oct 04, 2021 | 8:29 AM

अशोक चव्हाण यांच्या एकाधिकार शाहीला वैतागून शिवसेना सोडल्याचा आरोप सुभाष साबणे यांनी केलाय. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री चव्हाण यांनी त्यांचा आणि माझा संबंधच काय? असा सवाल उपस्थित केलाय. त्यांच्या पक्षाबाबत त्यांनी बोलावं, मी काँग्रेसमध्ये आहे अशीही आठवण त्यांनी करून देत साबणेंना चिमटा काढलाय.

शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांना देगलूर बिलोली जागेसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. सुभाष साबणे शिवसेनेत नाराज होते. त्यांनी आज भाजप प्रवेशाची घोषणा केली आहे. मात्र ही घोषणा करताना, “शिवसेनेत माझं कुणाशी वाकडं नव्हतं. अशोक चव्हाण यांच्या जिल्ह्यातल्या एकाधिकारशाहीला कंटाळून आपण शिवसेना सोडतोय”, असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या आरोपाला मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अशोक चव्हाण यांच्या एकाधिकार शाहीला वैतागून शिवसेना सोडल्याचा आरोप सुभाष साबणे यांनी केलाय. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री चव्हाण यांनी त्यांचा आणि माझा संबंधच काय? असा सवाल उपस्थित केलाय. त्यांच्या पक्षाबाबत त्यांनी बोलावं, मी काँग्रेसमध्ये आहे अशीही आठवण त्यांनी करून देत साबणेंना चिमटा काढलाय.

साबणे मुळातच शिवसेनेचे आहेत. मी काँग्रेस पक्षामध्ये आहे. मग त्यांचा आणि माझा काय संबंध?, असा सवाल करत साबणे यांनी शिवसेनेच्या संदर्भात भूमिका स्पष्ट करावी, असं अशोक चव्हाण म्हणाले. तर जाणारा काहीतरी बोलून जातो, असं सांगायला देखील अशोक चव्हाण विसरले नाहीत.

Published on: Oct 04, 2021 08:29 AM