SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 5 September 2021

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 5 September 2021

| Updated on: Sep 05, 2021 | 8:39 AM

गणपती उत्सवाची मागणी पूर्ण करण्याच्या हेतूने या आधीही रेल्वेने 217 अधिक विशेष गाड्या उपलब्ध केल्या आहेत. आता प्रवाश्यांच्या सोयीसाठी वातानुकूलित 8 विशेष गाड्या उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासीयांची सोय लक्षात घेता गणपती उत्सवासाठी मुंबई ते कुडाळ दरम्यान वातानुकूलित विशेष गाड्या उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी प्रमाणे गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाश्यांची संख्या अधिक असते. गणपती उत्सवाची मागणी पूर्ण करण्याच्या हेतूने या आधीही रेल्वेने 217 अधिक विशेष गाड्या उपलब्ध केल्या आहेत. आता प्रवाश्यांच्या सोयीसाठी वातानुकूलित 8 विशेष गाड्या उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर केले होते.

रेल्वेच्या वातानुकूलित विशेष गाड्या गणपती उत्सव-2021 दरम्यान आधीच घोषित करण्यात आलेल्या विशेष गाड्यांव्यतिरिक्त आहेत. कोकणामध्ये जाणाऱ्या आबालवृद्धांना ह्या सोयीचा लाभ घेता येईल. कोणालाही गणपती उत्सव साजरा करायला कोकणात जायला अडचण आम्ही येऊ देणार नाही व गरजेनुसार आणखी सोय करण्यात येईल, कुठल्या ही प्रवाश्यांना त्रास होऊ देणार नाही, असे दानवे म्हणाले.

Published on: Sep 05, 2021 08:38 AM