SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7 August 2021

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7 August 2021

| Updated on: Aug 07, 2021 | 8:37 AM

ग्रामीण भागात पाचवी ते आठवी वर्गाच्या शाळा सुरु करण्याचा विचार करत आहेत. तसेच शहरी भागात आठवी ते बारावी वर्गाच्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा आमचा मानस आहे. येणाऱ्या 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा आमचा विचार आहे,” असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

राज्यात अनेक दिवसांपासून शाळा बंद आहेत.  मात्र आता येत्या 17 ऑगस्ट पासून राज्यातील शाळा सुरु करण्यावर विचार सुरु आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली. त्या मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी सध्याची कोरोनास्थिती तसेच बंद असलेल्या शाळांवर भाष्य केले.

“राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा राज्याच्या शिक्षण विभागाचा विचार आहे. येत्या 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा विचार करत आहोत. त्याबाबत निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे. तसेच नियम शिथील केलेले आहेत, अशा ठिकाणी आम्ही ग्रामीण भागात पाचवी ते आठवी वर्गाच्या शाळा सुरु करण्याचा विचार करत आहेत. तसेच शहरी भागात आठवी ते बारावी वर्गाच्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा आमचा मानस आहे. येणाऱ्या 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा आमचा विचार आहे,” असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Published on: Aug 07, 2021 08:37 AM