VIDEO : Fast News | 12.30 PM | महत्वाच्या बातम्या | 09 June 2022
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होणार आहे. राष्ट्रीय निवडणूक आयोग दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. ही निवडणूक कधी होणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपल्याने ही निवडणूक होत आहे. त्यामुळे कोविंद यांना पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदाची संधी मिळणार की इतर कुणाला राष्ट्रपतीपदाची संधी दिली जाणार हे बघण्यासारखे ठरणार आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होणार आहे. राष्ट्रीय निवडणूक आयोग दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. ही निवडणूक कधी होणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपल्याने ही निवडणूक होत आहे. त्यामुळे कोविंद यांना पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदाची संधी मिळणार की इतर कुणाला राष्ट्रपतीपदाची संधी दिली जाणार हे बघण्यासारखे ठरणार आहे. एखादी महिलाही देशाची आगामी राष्ट्रपती असू शकते असंही सांगितलं जात आहे. तर, भाजपच्या एकूण राजकीय रणनीतीनुसार राष्ट्रपतीपदासाठी अनपेक्षित नावही पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रामनाथ कोविंद यांनी 25 जुलै 2017मध्ये राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती. त्यांचा कार्यकाळ जुलैमध्ये संपत आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नव्या राष्ट्रपतीपदाची शोधाशोध सुरू आहे.