VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2.30 PM | 22 September 2021
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दैनिक ‘सामना’ला पत्रं पाठवून शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. राऊत यांनी हे आरोप दळभद्री असल्याचं सांगत चंद्रकांतदादांवर सव्वा रुपयांचा दावा लावणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. चंद्रकांतदादा हे सव्वा रुपयावालेच आहेत, असा चिमटाही राऊत यांनी काढला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दैनिक ‘सामना’ला पत्रं पाठवून शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. राऊत यांनी हे आरोप दळभद्री असल्याचं सांगत चंद्रकांतदादांवर सव्वा रुपयांचा दावा लावणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. चंद्रकांतदादा हे सव्वा रुपयावालेच आहेत, असा चिमटाही राऊत यांनी काढला आहे. संजय राऊत यांनी चंद्रकांतदादांच्या पत्राल उत्तर देताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चंद्रकांतदादांनी पाठवलेल्या पत्रात काही दळभद्री आरोप केले आहेत आमच्यासंदर्भात. पीएमसी बँक आणि अमूक बँक. त्याबाबत मी चंद्रकांत पाटलांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करणार आहे. त्यांच्यावर दावा करणार आहे.
Latest Videos