VIDEO : 50 SuperFast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 : 30 PM | 7 July 2021

VIDEO : 50 SuperFast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 : 30 PM | 7 July 2021

| Updated on: Jul 08, 2021 | 2:49 PM

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. गेल्या 3 तासांपासून खडसेंची चाैकशी सुरू आहे. ईडीच्या चौकशीला जाण्यापूर्वी खडसेंनी मीडियाशी संवाद साधला.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. गेल्या 3 तासांपासून खडसेंची चाैकशी सुरू आहे. ईडीच्या चौकशीला जाण्यापूर्वी खडसेंनी मीडियाशी संवाद साधला. माझ्यावरील कारवायांमागे राजकीय सुडाचा वास आहे, मी भाजप सोडून राष्ट्रवादीत आल्यानेच माझ्यावर चौकशी सुरू आहे, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. ही जमीन एमआयडीसीची नाही. ती खासगी जमीन आहे.

एमआयडीसीने हा भूखंड संपादित केलेला नाही. त्याचा मोबदला दिलेला नाही. ताबाही दिलेला नाही. आम्ही सर्व खासगी व्यवहार केले आहेत. मी भूखंड खरेदी केला तेव्हा त्यावर मूळ मालकाचं नाव होतं. हे मी वारंवार सांगितलं आहे. या प्रकरणी पाच वेळा चौकशी झाली. अँटी करप्शन ब्युरोनेही चौकशी केली. आरोपात काही तथ्य नसल्याचा अहवालही त्यांनी दिला आहे. अजून किती वेळा चौकशी करणार आहात?, असा सवाल खडसे यांनी केला आहे.