VIDEO : 50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 14 July 2021

VIDEO : 50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 14 July 2021

| Updated on: Jul 14, 2021 | 2:41 PM

काँग्रेससोबत 2014 मध्ये धोका झाला. त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची (Congress NCP) आघाडी तुटली होती. काँग्रेस नेते काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना  (Sharad Pawar) भेटले.

काँग्रेससोबत 2014 मध्ये धोका झाला. त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची (Congress NCP) आघाडी तुटली होती. काँग्रेस नेते काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना  (Sharad Pawar) भेटले. पण या भेटीसाठी मला शरद पवारांचं निमंत्रणच नव्हतं, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी काल शरद पवारांची भेट घेतली. मात्र या बैठकीला नाना पटोले नव्हते. आगामी निवडणुकांसंदर्भात बैठकीत चर्चा झाली. महाआघाडीत कोणतेही फेरबदल सध्यातरी नाहीत. हायकंमाड जे निर्देश देतील त्यावर मी काम करतो. भाजपला पर्याय फक्त काँग्रेस आहे, ओबीसींचं आरक्षण भाजपने संपवले त्याविरोधात राज्यात आम्ही आंदोलन करणार आहोत, असं नाना पटोलेंनी सांगितलं.