VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 17 October 2021
पूर्वीच्या थकित वाहतूक नियमभंगाच्या दंडाची 400 रुपयांची रक्कम भरण्यास सांगितल्याने एका कार चालकाने वाहतूक पोलीस हवालदाराच्या अंगावर गाडी घातली. त्यानंतर त्याला बोनेटवरुन 700 ते 800 मीटर अंतरापर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक पुण्यात घडला आहे.
पूर्वीच्या थकित वाहतूक नियमभंगाच्या दंडाची 400 रुपयांची रक्कम भरण्यास सांगितल्याने एका कार चालकाने वाहतूक पोलीस हवालदाराच्या अंगावर गाडी घातली. त्यानंतर त्याला बोनेटवरुन 700 ते 800 मीटर अंतरापर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक पुण्यात घडला आहे. या प्रकरणी पुण्यातील मुंढवा पोलिसांनी कार चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. प्रशांत श्रीधर कांतावर (वय 43 वर्ष, रा. कन्हैया कॉम्प्लेक्स, महंमदवाडी, हडपसर) याला अटक केली आहे. याबाबत पोलीस हवालदार शेषराव जायभाय (वय 43 वर्ष) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रशांत कांतावर याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
Latest Videos