VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज |2 PM | 2 April 2022

VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज |2 PM | 2 April 2022

| Updated on: Apr 02, 2022 | 2:40 PM

मराठी भाषेबाबत बोलण्यापेक्षा मराठी भाषेत बोला. भाषेवरून आमच्यावर टीका झाली. आताही होतेय. त्या टीकेला मी किंमत देत नाही. टीका करणारे काय किंमतीचे आहेत मला माहीत आहे. त्यामुळे मी किंमत देत नाही. शिवसेनाप्रमुखांवर टीका झाली होती. हे मराठी भाषेबद्दल बोलतात आणि यांची नातवंड इंग्रजी शाळेत शिकतात, अशी टीका करण्यात आली होती.

मराठी भाषेबाबत बोलण्यापेक्षा मराठी भाषेत बोला. भाषेवरून आमच्यावर टीका झाली. आताही होतेय. त्या टीकेला मी किंमत देत नाही. टीका करणारे काय किंमतीचे आहेत मला माहीत आहे. त्यामुळे मी किंमत देत नाही. शिवसेनाप्रमुखांवर टीका झाली होती. हे मराठी भाषेबद्दल बोलतात आणि यांची नातवंड इंग्रजी शाळेत शिकतात, अशी टीका करण्यात आली होती. आमची मुलं इंग्रजी शाळेत शिकली. पण शिवसेना प्रमुखांनी पहिल्या दिवशी सांगितलं होतं इंग्रजी शाळेत आणि मराठी घरात असली पाहिजे. मॉम, डॅड इकडे चालणार नाही. आजोबाला आजोबाच बोललो पाहिजे. फार तर आज्या म्हणा. माझी दोन्ही मुलं इंग्रजी बोलतात. हिंदी बोलतात आणि मराठीही बोलतात. भाषा शिकणं हा गुन्हा नाहीये.