VIDEO : 50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 22 June 2021

VIDEO : 50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 22 June 2021

| Updated on: Jun 22, 2021 | 3:15 PM

 शिवसेना-भाजपची युती नैसर्गिक आहे. त्यावर संजय राऊत यांनी बोललं पाहिजे. त्यांनी शरद पवारांच्या पे रोलवर राहून बोलण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या व्यथा मांडाव्यात, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

शिवसेना-भाजपची युती नैसर्गिक आहे. त्यावर संजय राऊत यांनी बोललं पाहिजे. त्यांनी शरद पवारांच्या पे रोलवर राहून बोलण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या व्यथा मांडाव्यात, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील हे पालघर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. पवारांच्या पे रोलवर राहून पवारांची बाजू घेण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या व्यथा मांडल्या पाहिजे. आम्हाला हिंदुत्व पाहिजे. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आम्ही आहोत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला तोच संदेश दिला आहे. पूर्वीच्या युतीत आम्ही समाधानी होतो. आताची युती नैसर्गिक नाही, अशा शिवसैनिकांच्या भावना आहेत. त्या राऊतांनी मांडल्या पाहिजेत, असा सल्ला पाटील यांनी दिला.

Published on: Jun 22, 2021 03:14 PM