VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 26 May 2022
परबांनी बांधलेला रिसॉर्ट पाडण्याचे आदेश ठाकरे सरकारनं दिला आहे. चार दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं सांगितलं की, अनिल परबांना जी मुदत दिलेली होती, ती 2 मे 2022 ला संपली आहे. आता रिसॉर्टचं वीजपाणी बंद केलं पाहिजे. ज्या धाडी टाकल्या जात आहेत, त्या माझ्या तक्रारींच्या आधारे टाकल्याचं दिसतंय असं किरीट सोमय्यांनी मीडियाला सांगितलं.
अनिल परब यांच्या संबंधित मालमत्तांवरती सकाळपासून सात ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपकडून सुडबुद्धीने राजकारण सुरू असल्याची टीका केली जात आहे. तसेच विरोधकांकडून योग्य कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे. कारवाई संपल्यानंतर अनिल परब यांच्यावरती कोणती कारवाई होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. परबांनी बांधलेला रिसॉर्ट पाडण्याचे आदेश ठाकरे सरकारनं दिला आहे. चार दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं सांगितलं की, अनिल परबांना जी मुदत दिलेली होती, ती 2 मे 2022 ला संपली आहे. आता रिसॉर्टचं वीजपाणी बंद केलं पाहिजे. ज्या धाडी टाकल्या जात आहेत, त्या माझ्या तक्रारींच्या आधारे टाकल्याचं दिसतंय असं किरीट सोमय्यांनी मीडियाला सांगितलं.
Published on: May 26, 2022 02:59 PM
Latest Videos