VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 30 December 2021

VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 30 December 2021

| Updated on: Dec 30, 2021 | 2:53 PM

नुकत्याच 28 डिसेंबर रोजी समाप्त झालेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी अहमदनगर येथील रुग्णालयात कोरोना तपासणी केली असता त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले. दोन दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोना झाल्याचे उघड झाले होते.

नुकत्याच 28 डिसेंबर रोजी समाप्त झालेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी अहमदनगर येथील रुग्णालयात कोरोना तपासणी केली असता त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले. दोन दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोना झाल्याचे उघड झाले होते. त्यादेखील अधिवेशनात उपस्थित होत्या.  त्यामुळे कोरोनाचे हे लोण आता आमदारांमध्ये पसरते की काय अशी चिंता व्यक्त केली जात आहे. कालच 29 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, पती सदानंद सुळे व त्यांची दोन्ही मुले कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी आली होती. सुप्रिया सुळे यांनीही ट्विटरद्वारे ही माहिती दिली होती. आपली व कुटुंबियांची प्रकृती स्थिर असून संपर्कातील व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते.