VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 7 December 2021
मुंबई महानगर पालिका ठरवून बनावाबनवी आणि गोंधळाची स्थिती करत आहे. मुंबईतील कोस्टल रोड प्रोजेक्ट बाबत मुंबईत चाललं काय? असा सवाल करतानाच महापालिकेने कोस्टल रोडच्या सल्लागारांना अधिक रक्कम दिली आहे, असा आरोप शेलार यांनी केला आहे. 6 सप्टेंबर 2021 आणि 2 ऑक्टोबर 2021 रोजी मी पत्रकार परिषद घेतली होती.
मुंबई महानगर पालिका ठरवून बनावाबनवी आणि गोंधळाची स्थिती करत आहे. मुंबईतील कोस्टल रोड प्रोजेक्ट बाबत मुंबईत चाललं काय? असा सवाल करतानाच महापालिकेने कोस्टल रोडच्या सल्लागारांना अधिक रक्कम दिली आहे, असा आरोप शेलार यांनी केला आहे. 6 सप्टेंबर 2021 आणि 2 ऑक्टोबर 2021 रोजी मी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी कोस्टल रोड प्रकल्पात भ्रष्टाचार होत असल्याचं मी सत्ताधाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं. मात्र आजही या प्रकल्पात अनागोंदी आणि अफरातफरी चालू आहे, असं त्यांनी सांगितलं. कॅगने कोस्टल रोडवर काय ताशेरे ओढले त्यावरही शेलार यांनी भाष्य केलं. कोस्टल रोडचा डीपीआर हा अतिशय चुकीचा आणि गडबडीचा असल्याचं कॅगने म्हटलं आहे. डीपीआर करताना जे ट्रॅफिकचं अचूक विश्लेषण केलं जातं.
Latest Videos