SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 20 October 2021
च्च व तंत्र शिक्षण विभागाने 13 ऑक्टोबर 2021 रोजीच्या परिपत्रकान्वये सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यीत विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयामधील नियमित वर्ग दिनांक 20 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे. याच निर्णयाचा आधार घेत कृषी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न विद्यालये आणि महाविद्यालये सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील इयत्ता 12 वीपर्यंतचे वर्ग चार ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी हे 18 वर्षावरील असून बहुतेक विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. याचबरोबर राज्यातील कोविड-19 बाधित रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात कमी झालेली आहे. सद्यस्थितीत ही साथ नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 13 ऑक्टोबर 2021 रोजीच्या परिपत्रकान्वये सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यीत विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयामधील नियमित वर्ग दिनांक 20 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे. याच निर्णयाचा आधार घेत कृषी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न विद्यालये आणि महाविद्यालये सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Latest Videos