SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 30 September 2021

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 30 September 2021

| Updated on: Sep 30, 2021 | 8:35 AM

यंदाच्या पावसानं राज्यातील शेतकऱ्याला अक्षरश: उद्ध्वस्त केलं आहे. मागील काही दिवसांपासून संपूर्ण मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. गुलाब चक्रीवादळाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसलाय.

यंदाच्या पावसानं राज्यातील शेतकऱ्याला अक्षरश: उद्ध्वस्त केलं आहे. मागील काही दिवसांपासून संपूर्ण मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. गुलाब चक्रीवादळाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसलाय. अनेक भागात शेती पिकांसह जमीन खरवडून गेलीय. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, आदी पिकांचं 100 ठक्के नुकसान झालंय. तर फळबागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. अशावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला 50 हजार रुपयांची तातडीची मदत द्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे. पंचनामे होत राहतील. आधी शेतकरी आणि पूरग्रस्त नागरिकांना मदत द्या, अशी आक्रमक मागणी राज ठाकरे यांनी केलीय.