Bogus Medicines : बोगस गोळ्या-औषधांचा भांडाफोड, खरे मास्टरमाईंड नेमके कोण?
बनावट कंपन्याच्या माध्यमातून तब्बल ११ जिल्ह्यांमध्ये गोळ्या आणि औषधांचा पुरवठा झाला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गंभीर म्हणजे जानेवारी महिन्यांपासून सरकारी संस्थांमधून या गोळ्या आणि औषधांचा पुरवठा झालाय.
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या बोगस गोळ्या, औषधांचा भांडाफोड झालाय. धक्कादायक म्हणजे दहा पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये या बोगस औषधांचा पुरवठा झाल्याचं बोललं जातंय तर ज्या कंपन्या ही औषधं बनवताय त्या कंपन्याच प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याचे बोलले जात आहे. बनावट कंपन्याच्या माध्यमातून तब्बल ११ जिल्ह्यांमध्ये गोळ्या आणि औषधांचा पुरवठा झाला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गंभीर म्हणजे जानेवारी महिन्यांपासून सरकारी संस्थांमधून या गोळ्या आणि औषधांचा पुरवठा झालाय. दिव्य मराठीच्या रिपोर्टनुसार, गेल्या सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या धाराशीव जिल्ह्यातही बनावट औषधं पुरवण्यात आली. सुदैवाने औषध विभागाने हा साठा प्रतिबंधित केल्याने त्याचे वितरण झाले नाही. पण इतर जिल्ह्यांमध्ये बनावट औषधांचं वितरण झाल्याचे समोर येतं आहे. बीडच्या अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात हा साठा होता. यावेळी सूरत आणि ठाणे या दोन ठिकाणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालय हे सर्वसामान्य लोकांसाठी मोठं आधार मानलं जातं. पण धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. बघा स्पेशल रिपोर्ट