Old pension strike : कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात शुकशुकाट, बघा कसं आहे वातावरण?

Old pension strike : कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात शुकशुकाट, बघा कसं आहे वातावरण?

| Updated on: Mar 14, 2023 | 2:41 PM

VIDEO | मंत्रालयातील ७१ टक्के कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन योजना लागू करावा या मागणीच्या संपाला पाठिंबा

मुंबई : राज्यातील जवळपास १८ लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करावी. या प्रमुख मागणीसाठी हे सर्व सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. या सरकारी कर्मचाऱ्यांमुळे सरकारी रूग्णालये, शाळा, महाविद्यालये, पालिका, काही सरकारी विभागातील कामकाज ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहेत. यासह मंत्रालयातील तब्बल ७१ टक्के कर्मचाऱ्यांनी या संपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मंत्रालयात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. नेहमीच गजबलेला असणारा मंत्रालय परिसर आज संपामुळे शांत तसेच कमी वर्दळ येथे दिसून येत आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने मंत्रालयातील विविध विभागाची दालने रिकामी असल्याचे दिसून आले आहे.

Published on: Mar 14, 2023 02:41 PM