Special Report | ‘कहना क्या चाहते हो?’, बारसू रिफायनरी प्रकल्पाला राज ठाकरे यांचा विरोध की पाठिंबा?
VIDEO | विरोध की पाठिंबा? बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत राज ठाकरे यांचं मत काय? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बारसू प्रकल्पाबाबत आपली भूमिका मांडली पण त्यामध्ये स्पष्ट विरोध किंवा पाठिंबा कोणतीही भूमिका न घेतल्याचे बोलले जात आहे. नेमकं काय म्हणाले राज ठाकरे… काही मनसे पदाधिकारी बारसूच्या रिफायनरीचं समर्थन करत असताना राज ठाकरे यांनी रिफायनरीला विरोध दर्शवला आहे. मात्र एकीकडे युनेस्कोचा दाखला देताना राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पाबद्दल जे विधान राज ठाकरे यांनी केलं त्याबद्दल संभ्रम आहे. यापूर्वीही राज ठाकरे यांनी पक्षाची भूमिका म्हणून नाणार प्रकल्पाला थेट विरोध केला होता. तसाच थेट विरोध बारसूला दिसला नाही. जानेवारीमध्ये उद्योग बाहेर जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी टीका केली. तर महाराष्ट्र श्रीमंत आणि अग्रेसर असल्याने एक दोन उद्योग बाहेर गेल्याने काही फरक पडणार नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. मात्र आता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणं आता महाराष्ट्राला परवडणार नाही. अशा दोन विधानामुळे राज ठाकरे नेमकं केहना क्या चाहते हो….असा सवाल उपस्थित होत आहे. बघा स्पेशल रिपोर्ट