अहमदनगर सोलापूर महामार्गावर रोहित पवार समर्थकांचं रास्ता रोको, काय आहे कारण?

अहमदनगर सोलापूर महामार्गावर रोहित पवार समर्थकांचं रास्ता रोको, काय आहे कारण?

| Updated on: Jul 27, 2023 | 3:44 PM

VIDEO | अहमदनगर सोलापूर महामार्गावर सरकारच्या विरोधात रोहित पवार समर्थकांकडून घोषणाबाजी

अहमदनगर : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या आश्वासनानंतरही कर्जत-जामखेड एमआयडीसीबाबत बैठक न घेतल्याने आमदार रोहित पवार समर्थक आक्रमक झाले आहे. यावेळी अहमदनगर सोलापूर महामार्गावर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, त्यामुळे अहमदनगर सोलापूर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. कर्जत-जामखेडमधील नागरिक आणि युवकांकडून कर्जत- जामखेडमध्ये आज ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यादरम्यान, उदय सामंत यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड एमआयडीसी मागणी संदर्भात आम्ही बैठक लावली होती. मात्र अधिवेशन दरम्यान त्या बैठकीला हजर राहायला वेळ मिळाला नाही. त्यातील काही तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल, आंदोलन हा त्याला पर्याय नाही. आज कामकाज सल्लागार समितीची बैठक आहे, त्यात कालावधी कमी करण्याचा किंवा तोच ठेवण्याचा या संदर्भात निर्णय होईल’, असा शब्दही त्यांनी दिला.

Published on: Jul 27, 2023 03:44 PM