महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुढे ढकलली, कधी होणार पुढील सुनावणी?
VIDEO | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आठ महिन्यानंतरही अद्याप सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नाही, सुनावणी लांबणीवर...
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आठ महिन्यानंतरही अद्याप सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागलेला नाही, असे असतानाही या प्रकरणावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा लांबणीवर टाकली आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर येत्या मंगळवारी म्हणजे 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 10. 30 वाजता सुनावणी होणार आहे. तर मंगळवारी या प्रकरणावर नव्याने सुनावणी करण्यात येणार आहे. तसेच हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे द्यायचं की नाही? यावरही मंगळवारी निर्णय येण्याची शक्यता आहे. आज सकाळी साडेदहा वाजता महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकालाची सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष या प्रकरणावर येत्या मंगळवारी पुढील सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Published on: Feb 17, 2023 11:40 AM
Latest Videos