नबाव मलिक यांना दीड वर्षांनंतर अखेर जामीन मंजूर; नक्की काय आहेत आरोप?
VIDEO | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून १७ महिन्यानंतर जामीन मंजूर करण्यात आला. दोन महिन्यांसाठी नवाब मलिक यांचा जामीन अर्ज मंजूर, नवाब मलिक यांच्यावर कोणते आहेत आरोप?
नवी दिल्ली, ११ ऑगस्ट २०२३ | मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अन् गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी आर्थिक व्यवहार तसेच त्यांच्या बहिणीशी जमीन व्यवहार प्रकरणामुळे मलिक अडचणीत आले होते. परंतु सर्वोच्च न्यायालायने प्रकृतीच्या कारणास्तव दोन महिन्यांसाठी त्यांचा जामीन मंजूर केला आहे. दाऊद इब्राहिम यांच्याशी आर्थिक व्यवहार करणे तसेच त्याच्या बहिणीशी जमीन व्यवहार करण्यासंदर्भातील हे प्रकरण होते. या प्रकरणात नवाब मलिक यांना तब्बल एका वर्षानंतर त्यांना दोन महिन्यांसाठी जामीन मिळाला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंधित जमीन व्यवहारांशी संबंधित प्रकरण, टेरर फंडिंग आणि मनी लाँड्रिंगचा नवाब मलिक यांच्यावर आरोप आहे. तर १९९३ च्या बाँम्बस्फोट प्रकरणातील आरोपींकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप, कुर्ला परिसरात गुन्हेगार शाह वली खानसोबत जमिनीचा व्यवहार, गोवावाला कंपाऊंड जमिनीच्या व्यवहारात मलिक यांना अटक करण्यात आली आहे. आणि मलिकांनी सरदार खान आणि हसीना पारकरसोबत अनेक बैठका घेतल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे.