Shiv Sena पक्ष अन् चिन्हावर पुन्हा सुप्रीम फैसला, येत्या सोमवारी नेमकं काय घडणार?
tv9 Special Report | शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष नेमका कोणाचा? शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाची, याचा फैसला करण्यासाठी मोठी सुनावणी सुरु होणार, दोन्ही गटाची भूमिका काय? पाहा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, १६ सप्टेंबर २०२३ | शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाची, याचा फैसला करण्यासाठी मोठी सुनावणी सुरु होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात, ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात येत्या सोमवारी सुनावणी आहे, तर राष्ट्रवादीचा फैसला निवडणूक आयोग करणार आहे. त्यासाठी आयोगात 6 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर पुन्हा सुप्रीम फैसला येणार आहे. निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि चिन्हं एकनाथ शिंदेंना दिलं. त्याविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि आता पहिली सुनावणी 18 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात होणार आहे. त्याचवेळी सुनील प्रभूंच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या पुनर्विचार याचिकेवरही सुनावणी होणार आहे. अपात्रतेबरोबरच ठाकरे गटाची मुख्य नजर शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवर असेल. कारण आयोगानं शिवसेनेची कमान ठाकरेंऐवजी शिंदेंच्या हाती दिली आहे.