Tv9 Special Report : शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होऊ शकतात? अपात्रतेवर सुनावणी, कोणती शक्यता?
शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवरुन, सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरु झाली असून नियमित सुनावणीच्या पहिल्या दिवशी, ठाकरे गटाच्या वकिलांकडून झाला युक्तिवाद
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात घटनापीठासमोर मंगळवारी पुन्हा एकदा 16 आमदारांच्या अपात्रतेवरुन ठाकरे गटानं जोरदार युक्तिवाद केला. तर उद्या, बुधवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवरुन, सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरु झाली असून नियमित सुनावणीच्या पहिल्या दिवशी, ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. 10 वी सूची म्हणजेच पक्षांतर बंदी कायद्यानुसार 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई व्हावी, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. तर राज्यातील सत्तासंघर्षावर एखाद्या केसचा आधार नाही तर तथ्य तपासून निर्णय देणार अशी टिप्पणी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केली. ठाकरे गटाचे कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार कसे अपात्र होऊ शकतात? यावरुन युक्तिवाद केला. काय म्हणाले कपिल सिब्बल आणि नेमका काय केला युक्तिवाद… बघा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट