ते अध्यक्ष असते तर…, नार्वेकर यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊत खवळले; म्हणाले, ताडबतोब बडतर्फ
16 अपात्र आमदारांच्या प्रकरणावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यात रंगला आहे. नार्वेकर यांनी २ महिन्यात निर्णय घ्यावा या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अल्टीमेटवर टोला लगावला होता.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाचा निकाल आला आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाचा काही संघर्ष थांबताना दिसत नाही. आधी महाविकास आघाडीत त्यांचा संघर्ष सुरू होता. आता 16 अपात्र आमदारांच्या प्रकरणावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यात रंगला आहे. नार्वेकर यांनी २ महिन्यात निर्णय घ्यावा या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अल्टीमेटवर टोला लगावला होता. त्यांनी, मी चौकशी पूर्ण झाल्यावरच निर्णय घेणार. न्यायालयाला निर्णय घ्यायला 10 महिने लागले मी 2 महिन्यात निर्णय कसा घेऊ, उपस्थित केला होता. त्यावरून आता राऊत यांनी पलटवार केला आहे. तर ते राहुल नार्वेकर आहेत. ते अध्यक्ष असते तर असं बोलले नसते. तर परदेशात बसून त्यांनी ज्याप्रकारे यावर भाष्य केलं आहे. ते फक्त भगतसिंग कोश्यारी यांना शोभत होतं. मात्र घनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने नियमबाह्य वक्तव्य केलं आहे. त्यांना ताडबतोब बडतर्फ करा अशी मागणी राऊत यांनी केली आहे.