SC Fianl Decision on Article 370 | 370 कलम रद्द करण्याचा निर्णय योग्यच – सुप्रीम कोर्ट

| Updated on: Dec 11, 2023 | 12:00 PM

जम्मू-काश्मीरमधील 370 कलम रद्द करण्याचा निर्णय योग्यच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. कलम 370 रद्द करण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेसंदर्भात निकालवाचन करत 370 कलम रद्द करण्याचा निर्णय योग्यच असल्याचा सुप्रीम कोर्टाने म्हटलं

नवी दिल्ली | 11 डिसेंबर 2023 : जम्मू-काश्मीरमधील 370 कलम रद्द करण्याचा निर्णय योग्यच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
कलम 370 रद्द करण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेसंदर्भात निकालवाचन करत 370 कलम रद्द करण्याचा निर्णय योग्यच असल्याचा सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.  केंद्राचा निर्णय हा संविधानाला धरून असल्याचे कोर्टाने नमूद केलं. निकालवाचनामध्ये सुप्रीम कोर्टाने अनेक महत्वाचे मुद्दे नमूद केले. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा नव्हती. त्या ठिकाणी राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले होते. यामुळे राष्ट्रपतींना कलम 370 काढण्याचा अधिकार होता. त्यानुसार राष्ट्रपतींनी निर्णय घेतल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. हा निर्णय देताना तीन वेगवेगळे निर्णय असल्याचे सरन्यायधीश धनंजय चंद्रचूड यांनी यांनी म्हटले. त्यात माझा न्या. बी. आर. गवई आणि न्या. सूर्यकांत यांचा एक निर्णय आहे. दुसरा निर्णय न्या. संजय किशन कौल यांचा आहे तर तिसरा निर्णय संजीव खन्ना यांचा आहे. कलम 370 काढण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करणे योग्य नसल्याचे न्या.चंद्रचूड यांनी म्हटले.

Published on: Dec 11, 2023 12:00 PM
जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करू नये – प्रसाद लाड यांचा इशारा
370 कलम रद्द करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?