Shivsena 16 MLA Disqualification | सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना काय दिला थेट आदेश?
VIDEO | सत्ता संघर्षाच्या सुनावणीच्या निकालावरून सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावलं, राहुल नार्वेकर यांच्या कामकाजांवर सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली नाराजी, बघा थेट काय दिले आदेश?
नवी दिल्ली, १८ सप्टेंबर २०२३ | राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर निकाल ११ मे रोजी लागल्यानंतर सुप्रीम कोर्टानं १६ आमदारांच्या अपात्रेतच्या प्रकरणावर संपूर्ण निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवली होती. मात्र चार महिने उलटून गेल्यानंतरही राहुल नार्वेकर यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना आज सुनावलं आणि राहुल नार्वेकर यांच्या कामकाजांवर नाराजी देखील व्यक्त केली. यासह सत्ता संघर्षाच्या निकालात ठराविक वेळेत आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर निर्णय घेणं अपेक्षित होतं. पण कोर्टाच्या आदेशाचा आदर राखला गेला नसल्याचे सुप्रीम कोर्टानं थेट म्हटलं.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टाला उत्तरदायी आहेत. तुम्हाला हे प्रकरण ताबडतोब हाती घ्यावं लागेल. एक आठवड्यात सुनावणी घ्या. ठराविक वेळेत निर्णय घ्या, असे निर्देश याआधी दिले होते. त्यामुळे आता एक आठवड्यात कारवाई करा. कोर्टाच्या निर्णयाचा आदर राखला जाईल, अशी अपेक्षा असल्याचे ही कोर्टानं म्हटले आहे.