… म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी
सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिकांचा जामीन रद्द करावा, त्यांच्याकडे पाहून असे दिसते की त्यांची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे. त्यांना कोणत्याही उपचारांची आवश्यकता नाही, भाजप नेत्यानं नवाब मलिक यांच्याबद्दल नेमकं काय म्हटलं?
मुंबई, ८ डिसेंबर २०२३ : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजिच पवार यांना नवाब मलिक यांच्यासंदर्भात एक पत्र लिहिले आणि राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच नवाब मलिक यांना देण्यात आलेला जामीन रद्द करा आणि त्यांना पुन्हा तुरूंगात टाका, अशी मागणी भाजपच्या नेत्यानं केली आहे. नवाब मलिक यांची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा जेलमध्ये पाठवा, असे म्हणत भाजप नेते मोहित कंबोज यांनी अधिवेशनाला लावलेल्या उपस्थितीवरून ही मागणी केली आहे. नागपूर येथील विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान वैद्यकीय उपचारासाठी जामीन दिला असल्याने सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिकांचा जामीन रद्द करावा, त्यांच्याकडे पाहून असे दिसते की त्यांची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे. त्यांना कोणत्याही उपचारांची आवश्यकता नाही. त्यामुळे त्यांना तातडीने आर्थर रोड जेलमध्ये परत पाठवावे, असे त्यांनी म्हटले आहे.