Special Report | शिंदे-फडणवीस सरकारचं काय होणार? महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा येत्या 72 तासात फैसला?
VIDEO | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आता 72 तासांवर... शिंदे-फडणवीस सरकार राहणार की कोसळणार? पहा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : महाराष्ट्रच नाही तर, शिंदे-फडणवीस सरकारचं काय होतं? याकडे देशभरातल्या राजकीय वर्तुळाच्या नजरा आहेत आणि सत्तासंघर्षाचा हा निकाल आता 72 तासांवर आलाय. 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला निकाल 11 किंवा 12 मे रोजी लागण्याची शक्यता आहे. गुरुवारी 11 तारखेला सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरु आहे. शुक्रवारी 12 तारखेलाही सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरु आहे. शनिवारी 13 तारखेला कामकाज बंद आहे. आणि 14 तारखेला रविवार आहे, त्यामुळं स्वाभाविकपणे कामकाज बंद आहे आणि सोमवारी 15 तारखेला घटनापीठातील न्यायमूर्ती एम.आर. शाह निवृत्त होत आहेत. निवृत्तीच्या दिवशी सुप्रीम कोर्टाद्वारे त्यांना सेंडॉफ देण्यात येईल. त्यामुळं त्यादिवशी घटनापीठाच्या कामकाजाची शक्यता कमी आहे, म्हणून 11 किंवा 12 तारखेलाच निकाल येण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांचं काय होणार हाच महत्वाचा मुद्दा आहे.
घटनातज्ज्ञांच्या मते, आमदारांच्या अपात्रेचा निकाल थेट सुप्रीम कोर्ट देणार नाही. तर एक तर प्रकरण सध्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे येणार किंवा तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळांकडे येणार. झिरवळांनी तर निकालाआधीच सांगितलंय की, माझ्याकडे प्रकरण आलं तर 16 आमदार अपात्र होणार आणि राहुल नार्वेकरांचं म्हणणंय, की आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांनाच आहे. नेमकं कोणत्या अध्यक्षांकडे सुप्रीम कोर्ट प्रकरण सोपवणार हा सर्वात कळीचा मुद्दा असेल. अर्थात प्रकरण राहुल नार्वेकरांकडे येवो की मग झिरवळांकडे? प्रकरणावर अंतिम निकाल देण्यासाठीही संबंधित अध्यक्षांना कोर्टाकडून कालमर्यादा ठरवून देण्यात येईल, असंही कायदेतज्ज्ञांना वाटतंय. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट