Maharashtra Band | राजकारणातली माणुसकी केंद्र सरकारने संपवली, सुप्रिया सुळेंचा घणाघात

Maharashtra Band | राजकारणातली माणुसकी केंद्र सरकारने संपवली, सुप्रिया सुळेंचा घणाघात

| Updated on: Oct 11, 2021 | 11:46 AM

शेतकऱ्यांवर क्रूर अन्याय होताना दिसतोय. त्यांच्या समर्थनार्थ आजचा महाराष्ट्र बंद होतोय. राजकारणात माणुसकी जिवंत होती. मात्र आता केंद्रात असलेल्या सरकारने ती माणूसकी संपवून टाकली आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केलीय

शेतकऱ्यांवर क्रूर अन्याय होताना दिसतोय. त्यांच्या समर्थनार्थ आजचा महाराष्ट्र बंद होतोय. राजकारणात माणुसकी जिवंत होती. मात्र आता केंद्रात असलेल्या सरकारने ती माणूसकी संपवून टाकली आहे. ज्या शेतकऱ्यांचा खून या सरकारमधील एका मंत्रीपुत्राने केलाय. आजही तो व्हिडीओ पाहताना अंगावर शहारे येतात. इतका क्रूर तो व्हिडीओ आहे. पण तरी देखील भाजपतील लोक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ असलेल्या महाराष्ट्र बंदला समर्थन देत नाहीत. किंबहुना विरोध करतायत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.