दमदाटीवरून सुळेंची अजितदादांवर टीका, हर्षवर्धन पाटलांच्या कन्येकडून ‘तो’ व्हिडीओ ट्वीट
सुप्रिया सुळे यांनी दमदाटीवरून इंदापुरातील अजित पवार गटाच्या नेत्यांवर टीका केली. तो व्हिडीओ भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी शेअर केलाय. जैसे करनी... वैसी भरणे...व्हिडीओ ट्वीट करताना अंकिता पाटील यांनी असं कॅप्शन दिलं.
महायुतीत इंदापूरचं टेन्शन काही केल्या कमी होत नाही. सुप्रिया सुळे यांनी दमदाटीवरून इंदापुरातील अजित पवार गटाच्या नेत्यांवर टीका केली. तो व्हिडीओ भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी शेअर केलाय. हा व्हिडीओ ट्वीट करताना अंकिता पाटील यांनी कॅप्शनमध्ये जैसे करनी… वैसी भरणे… असं म्हटलंय. सुप्रिया सुळे यांच्या दाव्याला अंकिता पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या दुजोरा दिलाय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतरही इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांचा अजित पवारांवरचा राग कायम असल्याचे समोर आले. एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना खुलं चॅलेंज दिलंय. तर इंदापुरातील दमदाटीवरून झालेल्या आरोपांनी पाटील आक्रमक होत त्यांनी फडणवीस यांना पत्र लिहिलंय. दमदाटीच्या वादाची सुरूवात अजित पवार यांच्या बारामतीतील एका मेळाव्याने झाली होती. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…