Supriya Sule म्हणाल्या, जयंत पाटील राज्याचे मुख्यमंत्री होणार असतील तर…
VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना अजित पवार गटात येण्याच्या ऑफर? जयंत पाटील मुख्यमंत्री होणार? राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'अजित पवार गटाकडे गेल्यावर जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करणार असतील तर...'
सोलापूर, ८ ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार तर राज ठाकरे यांचे नाव राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना अजित पवार गटात येण्याच्या ऑफर येत आहेत. राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरूये की, अजित पवार गटात आल्यास तुम्हाला मुख्यमंत्री करू, अशी ऑफत जयंत पाटील यांना आली आहे. दरम्यान या सुरू असलेल्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारले असता, त्यांनी मोठं वक्तव्य केले आहे. अजितदादा गटाकडे गेल्यावर जयंत पाटलांना मुख्यमंत्री करणार असतील तर चांगलंच आहे. ही चांगली गोड बातमी आहे. जयंतराव मुख्यमंत्री होणार असतील तर मला आनंदच होईल, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहे.