Supriya Sule : पुण्यातल्या टुर ऑपरेटरला माहीत होतं, मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल
Supriya Sule on Pahalgam Attack In All Party Meeting : दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत काल खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला सुरक्षा यंत्रणेबाबत प्रश्न विचारले.
पर्यटनस्थळ खुलं केल्याची माहिती स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वपक्षीय बैठकीत उपस्थित केला आहे. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात काल संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक दिल्लीत पार पडली. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी हा प्रश्न उपस्थित केला. पुण्यात टुर ऑपरेटरला कळतं, पुणे आणि मुंबईच्या टुर ऑपरेटरकडून बुकिंग घेतलं जातं. पण स्थानिक यंत्रणेला माहिती नाही? याबद्दल तिथल्या स्थानिक सुरक्षा आणि यंत्रणांना काहीच कसं समजलं नाही? असंही यावेळी त्यांनी म्हंटलं. तर पहलगाम हल्ल्याबाबत चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी इंडियन युनियन मुस्लिम लीगचे राज्यसभा खासदार हैरिस बिरान यांनी केली आहे.

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा

'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी

मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले

पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
