Breaking : कोणत्याही परिस्थितीत वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आणा, सर्व पक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे न्या; सुप्रिया सुळेंची मागणी

Breaking : कोणत्याही परिस्थितीत वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आणा, सर्व पक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे न्या; सुप्रिया सुळेंची मागणी

| Updated on: Sep 15, 2022 | 11:52 AM

सत्तेत बसणं म्हणजे नुसतच सत्कार घेणं. लाल दिवा बंद करून लोकांची गैरसोय करणं आणि गाड्यांचा सुसाट धावणारा ताफा नसतो. सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची संधी यालाच सत्ता म्हणतात, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

पुणे: वेदांता प्रकल्प गुजरातला (vedanta project) गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने पुण्यात जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (supriya sule) यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांना लक्ष्य केलं आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी गंभीर व्हावं. राज्य आणि देशासमोर बेरोजगारीचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे हलगर्जीपणा करून चालणार नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. राज्याच्या हितासाठी एकत्र यावं. सर्व पक्षीय प्रतिनिधींचं शिष्टमंडळ दिल्लीत न्यावं. पंतप्रधानांना भेटून आपला प्रकल्प परत आणावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. हा राज्यातील अडीच ते तीन लाख रोजगाराचा प्रश्न आहे. त्यावर गांभीर्य व्हायला हवं. तळेगावला साईट पाहिली होती. सर्व तयारी झाली होती. मग अचानक काय झालं? प्रकल्प गुजरातला गेला. त्याची जबाबदारी घ्या. सत्तेत बसणं म्हणजे नुसतच सत्कार घेणं. लाल दिवा बंद करून लोकांची गैरसोय करणं आणि गाड्यांचा सुसाट धावणारा ताफा नसतो. सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची संधी यालाच सत्ता म्हणतात, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

Published on: Sep 15, 2022 11:51 AM