Supriya Sule: आंब्याच्या झाडालाच दगड मारतात बाभळीच्या झाडाला कोणी दगड मारतं का?, सुप्रिया सुळेंचा राज यांना टोला
Supriya Sule: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती खालावली आहे. त्यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली.
ठाणे: आंब्याच्या झाडालाच दगड मारतात बाभळीच्या झाडाला कोणी दगड मारतं का?, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांना लगावला आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेतून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला होता. पवार जाती जातीत भांडण लावतात. राष्ट्रवादीचा जन्म झाल्यापासून राज्यात जातीवादाला खतपाणी मिळाली, असा आरोपही राज यांनी केला होता. त्याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी हा टोला लगावला. सुप्रिया सुळे या मीडियाशी संवाद साधत होत्या. आमच्यावर यशंवतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या कृतीत नम्रता होती. सहनशीलता होती. अल्टिमेटम हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हता. त्यामुळे या शब्दाचा मला अभ्यास नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान, 56 इंचची भाषा वगैरे भाषणा पुरतं छान असते. एक माहौल असतो त्यावेळी ते बोलत होते. पण वास्तवापासून दूर असतात, असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.