“सत्तेसाठी उद्धव ठाकरे मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला बसले”, भाजपच्या या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणतात…
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटणामध्ये देशातील विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली. विरोधीपक्षांच्या बैठकीला उद्धव ठाकरे यांनी देखील हजेरी लावली होती. मात्र या बैठकीला मेहबुबा मुफ्ती देखील होत्या. यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपकडून टीका करण्यात आली होती. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटणामध्ये देशातील विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली. विरोधीपक्षांच्या बैठकीला उद्धव ठाकरे यांनी देखील हजेरी लावली होती. मात्र या बैठकीला मेहबुबा मुफ्ती देखील होत्या. यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपकडून टीका करण्यात आली होती. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपकडे आज बोलण्यासाठी काही उरलं नाही आहे. शेजारी बसणं हा काय गुन्हा आहे का?”, असा प्रतिप्रश्न सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
Published on: Jun 25, 2023 01:12 PM
Latest Videos