गृहमंत्री जवाब दो; खासदार सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

गृहमंत्री जवाब दो; खासदार सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

| Updated on: Sep 26, 2022 | 6:03 PM

ज्यांना आपल्या विभागाचा अभ्यास नाही. जे स्वत: रोज चुका करतात. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार?, असा टोला त्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना लगावला.

नाविद, पठाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बारामती: शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून धमक्या देण्यात येत असल्याने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातली (maharashtra) एक नागरीक म्हणून गृहमंत्र्यांना न्याय मागतेय. राज्यात वातावरण प्रचंड अस्थिर आहे. तुमचे मंत्रीच धमक्या द्यायला लागलेत. गृहमंत्री जवाब दो. तुमचे मंत्री अशा धमक्या देणार असतील तर तुम्ही त्यांना आवरणार की नाही आवरणार? असा संतप्त सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. ज्यांना आपल्या विभागाचा अभ्यास नाही. जे स्वत: रोज चुका करतात. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार?, असा टोला त्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत (tanaji sawant) यांना लगावला.

Published on: Sep 26, 2022 06:02 PM