सुप्रिया सुळेंचा ‘हा’ लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
बारामती हा शरद पवार यांचा बालेकिल्ला असून या मतदारसंघात शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे तर महायुतीतील राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्या सुनेत्रा पवार या दोन्ही उमेदवार लोकसभा निवडणुकीत आमने-सामने असणार आहेत. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील सुप्रिया सुळे यांचाही जोरदार प्रचार सुरू
बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. यंदा बारामती मतदारसंघात पवार विरूद्ध पवार असा सामना रंगताना दिसणार आहे. बारामती हा शरद पवार यांचा बालेकिल्ला असून या मतदारसंघात शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे तर महायुतीतील राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्या सुनेत्रा पवार या दोन्ही उमेदवार लोकसभा निवडणुकीत आमने-सामने असणार आहेत. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील सुप्रिया सुळे यांचाही जोरदार प्रचार सुरू आहे. अशातच सुप्रिया सुळेंचा मुळशीतील ग्रामीण भागात प्रचार सुरू आहे. यावेळी तीन नंबर माझ्यासाठी लकी असून मतपत्रिका 3 असून माझा मतपत्रिकेत नंबरही तिसराच असल्याचे सुप्रिया सुळे आपल्या सभेत सांगितले. मुळशीमध्ये तीनही जिल्हा परिषद गटाच्या परिसरात सुप्रिया सुळे यांनी सभा घेतल्या. शहरी भागातील पदयात्रा, गावबैठकी घेत यावेळी सुप्रिया सुळे यांनी मतदारांशी संपर्क साधला.