सुप्रिया सुळे यांनी अमरावतीतील अंबादेवी, एकवीरेचं घेतलं दर्शन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे अमरावती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी अमरावती इथल्या अंबादेवी आणि एकवीरा देवीचं दर्शन घेतलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे अमरावती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी अमरावती इथल्या अंबादेवी आणि एकवीरा देवीचं दर्शन घेतलं. मंदिराला प्रदक्षिणा घालून त्यांनी देवीची ओटी भरली. यावेळी दर्शनानंतर त्यांनी राष्ट्रवादी नेत्यांच्या नाराजीवर प्रतिक्रियादेखील दिली. “मी मंदिरात कधीही मागायला येत नाही, केवळ आभार मानायला येते”, असंही त्या म्हणाल्या. शरद पवार यांचं नाव राष्ट्रपती पदासाठी घेतलं जात आहे, या प्रश्नावर सुपिया सुळे म्हणाल्या, “मला याबाबत काहीच माहीत नाही. मी एका संघटनेत काम करते. मी एक खासदार असल्याने मला वैयक्तिक मताचा फार कमी अधिकार असतो.”
Published on: Jun 14, 2022 01:31 PM
Latest Videos